Sat, Jul 04, 2020 14:03होमपेज › Jalna › जालना : साडेगावात अनैतिक संबंधातून खून

जालना : साडेगावात अनैतिक संबंधातून खून

Last Updated: May 18 2020 10:51AM

संग्रहित छायाचित्रवडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील साडेगाव येथे घर बांधकामासाठी गेलेल्या तिर्थपुरी येथील तरुणाचा इंदलगाव शिवारात खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (दि.१७) मे च्या रात्री १० च्या दरम्यान घडली. अनैतिक संबंधातून खून झाला असल्याचे समोर आले आहे.

वाचा :जालना जिल्ह्यात कोरोना रुग्ण २५ वर

गोंदी पोलिसांनी आरोपीच्या घरात जाऊन  १ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी मयत शिवाजीचा भाऊ ब्रिजेश कासार यांच्या फिर्यादीवरून आकाश दगडू कांबळे व संदीप ज्ञानदेव कांबळे (रा.साडेगाव ता.अंबड) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला. ही कारवाई नवीनच रुजू झालेले गोंदी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे. गोपनीय शाखेचे पो. कॉ. महेश तोटे पो. हे. कॉ. खडेकर, पो. ना. चव्हाण, योगेश दाभाडे, मदन गायकवाड, अविनाश पगारे यांनी केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर  करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले.

वाचा : जालना : गुटख्याचा ट्रक पकडून ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त