Tue, May 21, 2019 22:19होमपेज › Jalna › पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ

पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 1:37AMरामनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील मौजपुरी व रामनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या वानराने  धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या वानराने  सहा जणांना जखमी केले. त्यात एक  महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

रामनगर येथे    मंगळवारी कालिंदा रामेश्वर सरकाळे ही महिला शेतात काम करत असताना पिसाळलेल्या वानराने अचानक तिच्यावर  हल्ला केला. यावेळी वानराने घतलेल्या चाव्यात ती गंभीर जखमी झाली. 

दुसर्‍या घटनेत सखुबाई तुकाराम सरकाळेला लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्या वेचत असताना वानराने तिच्या हाताला चावा घेऊन तोंडावर थापड मारली. त्यात महिलेचा  दात पडला. दोन्ही महिलांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  वानराने  मौजपुरी येथील मनोहर गोरे, भिलपुरी व मानेगाव येथील दोन मोटारसायकल चालकांनासुद्धा चावा घेतला. वानराच्या हल्ल्यामुळे  रामनगर व मौजपुरी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी शेतात जाण्यास धजावेना

शेतकरी शेतात पेरणीची कामे असूनही जाण्यास तयार नाहीत. या पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी सरपंच अ‍ॅड. सोपान शेजूळ यांनी भ्रमणध्वनीवरून वनविभागाच्या अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली होती, परंतु वन विभागाचे कर्मचारी गावात आले नाहीत. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.