Sat, Jul 20, 2019 11:08होमपेज › Jalna › जाफराबादेत 920 तरुणांचे मुुंडण 

जाफराबादेत 920 तरुणांचे मुुंडण 

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 28 2018 1:08AMजाफराबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने  जाफराबाद शहरातील तहसील कार्यालयासमोर   मराठा बांधवांनी मुंडण करून सरकार विरोधातील आपला रोष प्रगट केला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मुंडण आंदोलन असल्याचा दावा यावेळी सकल मराठा समजाच्या वतीने करण्यात आला.

जाफराबाद तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळपासून सकल मराठा  बांधवाच्या वतीने सरकारविरोधात मुंडण अांदेालनास सुरुवात करण्यात आली.  या आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी मुंडण करण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे दिसून आले. सकाळपासून सुरू असलेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होते. मुंडण करण्यासाठी नंबर लागत नसल्याने अनेकांनी आपापल्या गावात जाऊन मुंडण करून घेण्यास सुरुवात केली. यावेळी कै. काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करून मुंडण आंदोलनास सुरुवात करण्यात आली.आता मरायचे नाही तर मारायचे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

सहा  सदस्यांचे  राजीनामे

सिपोरा : सिपोरा आंभोरा येथील नऊपैकी सहा ग्रामपंचायत सदस्यांनी  पदाचे राजीनामे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडेे दिले आहे. यामध्ये पुष्पा विजय अंभोरे, सुनील सदाशिव अंभोरे, वैशाली प्रशांत अंभोरे, दिलीप रामकृष्ण अंभोरे, मंगला राजेंद्र अंभोरे, भगवान गिरणारे यांचा समावेश आहे.