Mon, Jul 22, 2019 04:44होमपेज › Jalna › कामे न करता मंत्री फिरतात सुटाबुटात : अजित पवार

कामे न करता मंत्री फिरतात सुटाबुटात : अजित पवार

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:12AMमंठा : प्रतिनिधी 

भाजपचे मंत्री सुटबुट व जॅकेटमधे फिरत असून शेतकरी व गोरगरीब जनतेची कामे  करण्याऐवजी केवळ शायनिंग करीत फिरत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व्यासपीठावर माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , माजी मंत्री जयंतराव पाटील, आमदार राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  सध्याच्या सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका करून सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नाची जाण नसल्याचे सांगितले. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे वाळू उपसामंत्री असल्याची टीका  लोणीकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. सूत्रसंचालन अ‍ॅड.पंकज बोराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल आकात यांनी केले.

भाजपकडून जनतेची फसवणूक
भाजपने खोटी आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बदनापूर येथे हल्‍लाबोल आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, विक्रम काळे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, कदीर मौलाना आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

पवार म्हणाले की, साडेतीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने व तीन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या राज्य शासनाने अच्छे दिन आणू हे सांगून शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव, युवकांना नोकर्‍या, विदेशातील काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू, खोटी आश्वासने दिले. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गोरगरिबांना परवडण्यासारखे नाही. युवकांना नोकर्‍या नाही. कापूस, सोयाबीन, तुरीला भाव नाही, कर्जमाफीचे गाजर दाखवले जाते. सरकारने ऑनलाइनच्या लाइनीत शेतकर्‍याला सपत्नीक उभे केले. हे सरकार टप्प्याटप्प्याने 1400 शाळा बंद करणार आहे. 

यावेळी जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, डॉ. निसार देशमुख, कपिल आकात, प्रदीप सोळुंके, उत्तमराव पवार, रघुनाथ तौर, मनीषा टोपे, सुरेखा लहाने, बदनापूर नगराध्यक्षा चित्रलेखा जर्‍हाड, बबलू चौधरी, बाळासाहेब वाकुळणीकर, कैलास मदन, पांडुरंग जर्‍हाड,  राम सिरसाठ, राजेश चव्हाण, रामधन कळंबे, नंदकुमार देशमुख, अ‍ॅड. राजेश्वर देशमुख, फेरोज खान पठाण,  शेख सउद, शेख कौसर, सुधाकर दानवे, केशव जंजाळ, अरुण पैठणे यांची उपस्थिती होती. 

पोलिस निरीक्षकाची हुकूमशाही
खासदार रावसाहेब दानवे व बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल करताना पवार यांनी या ठिकाणी अधिकारी दबावात काम करत आहे. कुचेंनी आपला नातेवाईकच पोलिस निरीक्षक म्हणून आणला असून तो हुकूमशाही करत असल्याची टीका पवार यांनी केली.