Sun, Nov 17, 2019 13:29होमपेज › Jalna › जालना : झोपेतच अवजड वस्तूने डोक्यात घाव घालून एकाचा खून 

जालना : झोपेतच अवजड वस्तूने डोक्यात घाव घालून एकाचा खून 

Published On: Jun 24 2019 9:48AM | Last Updated: Jun 24 2019 9:45AM
वडीगोद्री (जि. जालना) : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना डोक्यात अवजड वस्तूने घाव घालून खून केल्याची घटना आज पहाटे (२४ जुन ) २ ते ३ च्या दरम्यान घडली. माणिक जिजा मुळे (वय ५५ रा. महाकाळा) असे खून झाल्यालेचे नाव आहे. परिसरात या घटनेची माहिती कळताच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मयत मुळे यांच्या पत्नी यांना कळताच त्यांनी पोलिस पाटील राजेंद्र कव्हळे यांना सांगितली. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच गोंदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण, सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे आणि पोलिस कर्मचारी होते. 

महादेव मुळे यांचा खून घरातील व्यक्तीनेच केला असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोचे नाव समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.