Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Jalna › गतवर्षी कवडीचा दाम, तर यंदा पेर्‍याची चिंता

गतवर्षी कवडीचा दाम, तर यंदा पेर्‍याची चिंता

Published On: Jun 11 2018 12:40AM | Last Updated: Jun 10 2018 11:37PMजालना : प्रतिनिधी

पेरणी तोंडावर आहे, पण तालुक्यातील शेतकरी मात्र अद्याप निराशेत बुडाला आहे. कारण गेली वर्षभर शेतकर्‍याने पिकवलेल्या मालाला कवडीचा दाम मिळत आहे. गेल्या खरीप हंगामात पिकवलेला सोयाबीन, मका, उडीद, तूर, हायब्रीड ज्वारीसारख्या कडधान्याला नीचांकी भाव मिळाला. बाजारात  शेतकरी लुटला गेला.

शासन मात्र हमीभावाची टिमकी वाजवत राहिले. त्यामुळे यावर्षी तरी घामाला दाम मिळेल का, याबाबत शेतकरी साशंक आहे. त्यातून ‘पेरणी कशाची करू’ ही विवंचना त्याच्यासमोर आहे. रोहिणी, मृग नक्षत्राने तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. 

सलग तीन दिवस संततधार पावसाने जमिनीमध्ये पेरणी योग्य ओलावा आहे, पण कुठले पीक घ्यावे म्हणजे आपला संसार चालेल, हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. गेल्या वर्षी शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पिकवलेल्या सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासारख्या शेतीमालाला नीचांकी भाव मिळाला. 

पंतप्रधान मोदी यांनी ‘डाळी’ पिकवण्याचे केलेले आवाहन सकारात्मक घेत भरघोस उत्पादन घेतले, पण हा उत्पादित झालेला शेतीमाल बाजारात खरेदी करण्याची स्थिती, यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी घेण्यास शासन विसरले. राज्याच्या पणन विभागाने थेट उडीद, तूर खरेदीचा फार्स राबवला, पण त्याची आकडेवारी पाहता ती खरेदी किती तुटपुंजी आहे, हे दिसते. सतत हमीभावाची टिमकी वाजवणार्‍या शासनाने व्यापारी हमीभावानेच खरेदी करू शकतील, अशी यंत्रणा राबवली नाही.