Fri, Sep 21, 2018 21:13होमपेज › Jalna › कोल्हापूर जिल्हा संघ उपांत्य फेरीत 

कोल्हापूर जिल्हा संघ उपांत्य फेरीत 

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 08 2018 10:43PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात 69 व्या मिनिटाला हरिष पाटील याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा संघाने अमरावती जिल्हा संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाशिक येथे सुरू असणार्‍या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना शुक्रवारी झाला. शनिवारी  कोल्हापूरचा उपांत्य सामना पुणे जिल्हा संघाशी होणार आहे.  

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे (विफा) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बाद (नाकाऊट) पद्धतीच्या स्पर्धेतील पहिला सामना कोल्हापूर विरुद्ध बीड जिल्हा यांच्यात झाला. हा सामना कोल्हापूर संघाने 14-0 असा एकतर्फी जिंकत विजयी सलामी दिली. गुरुवारच्या सामन्यात विजयाची पुनरावृत्ती करत धुळे संघाला 5-1 असे नमविले. शुक्रवारी झालेल्या तिसर्‍या सामन्यात कोल्हापूरने अमरावती संघावर एकमेव गोलने 
मात केली. 69 व्या मिनिटाला प्रतीक बदामेच्या पासवर हरिष पाटीलने विजयी गोलची नोंद केली. 

सामन्यात सुरज शिंगटे, प्रथमेश हेरेकर, प्रतीक बदामे यांनी फॉरवर्डला तर स्वराज्य सरनाईक, सिद्धेश यादव, संकेत साळोखे यांनी हाफला आणि मसूद मुल्ला, 
पवन माळी, हरिष पाटील, श्रेयश मोरे यांनी बचाव फळीत उत्कृष्ट खेळ केला. सर्वांना प्रशिक्षक गजानन मनगुतकर यांचे मार्गदर्शन 
लाभले.