Mon, May 27, 2019 01:26होमपेज › Jalna › सोने उजळून देतो म्हणून महिलेची केली फसवणूक  

सोने उजळून देतो म्हणून महिलेची केली फसवणूक  

Published On: Feb 23 2018 1:31AM | Last Updated: Feb 23 2018 1:31AMअंबडः प्रतिनिधी

ठाकूरनगर येथील शारदा अशोक सव्वासे यांना सोने उजळून देतो, अशी थाप मारून दोन तोळ्यांचे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भामट्याने लंपास केली. ही घटना गुरुवार (22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. 

शारदा सव्वासे यांच्याकडे दोन जण आले. प्रथम त्यांनी उजाला पावडरने भांडी उजळून देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. भांड्याची चकाकी दाखविल्यानंतर चोरट्यांनी आपल्याकडे सोन्या-चांदीचे दागिने असल्यास सोनाराकडे जायची आवश्यकता नाही. आम्ही ते सुद्धा उजळून देतो, अशी थाप मारली. यावेळी शारदाबाईंनी घरातील दीड तोळयाचे सोन्याचे गंठण व तीन ग्रॉम सोन्याची पोत असे दोन तोळयांचे सोन्याचे दागिने उजळण्यासाठी म्हणून  दिले. यावेळी भामट्यांनी शारदाबाईंना बंद डब्यात हळद, पाणी  व उजाला पावडरमध्ये दागिने मिसळून 10 मिनिटे गरम पाण्यात उकळण्यास सांगितले. झाकण उघडू नका असा सल्‍लाही दिला. शारदाबार्ईंना  संशय आल्याने त्यांनी लगेच डबा उघडला, मात्र तोपर्यंत भामटे दुचाकीवरून  फरार झाले. हा प्रकार त्यांनी पती अशोक सव्वासे यांना सांगितला.

अंबडमध्ये चोरीच्या घटनांत वाढ
या पूर्वीही चोरीच्या घटना भरदिवसा घडल्या आहेत. दुचाकीवरून गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे प्रकार, बँकेसमोरून वृद्धाच्या हातातील अंगठी हिसकावणे, घरासमोरून व्यापार्‍याची पैश्याची बॅग ओढून नेणे, आठवडी बाजारात मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरी, बस्थानकातून पॉकेट व महिलांचे दागिने लंपास करणे अशा घटना घडल्या आहेत.