Fri, Apr 26, 2019 17:40होमपेज › Jalna › जाफराबादला बारामती बनविणार

जाफराबादला बारामती बनविणार

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:35PMजाफराबाद : प्रतिनिधी 

जाफराबाद परिसरात असणार्‍या खडकपूर्णा प्रकल्पामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असले, तरी बारामती अ‍ॅग्रो साखर काराखान्यामार्फत  येथील ऊस खरेदी करून या भागाला ऊस उत्पादनात बारामती बनविणार असल्याचे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले.   

निमखेडा बु. येथे गुरुवारी (दि. 3) ऊस उत्पादक शेतकरी मेळावा व युवक कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी  पवार बोलत होते. यावेळी माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेश चव्हाण, पंकज बोराडे, रामधन कळंबे, लक्ष्मण ठोंबरे, सुभाष गुळवे, सुरेखा लहाने, रमेश सपकाळ, गजानन पवार आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, ज्या शेतकर्‍यांच्या भरवशावर भाजप सरकार निवडून आले त्यांनीच शेतकर्‍यांना बळीचा बकरा बनविला आहे. महाराष्ट्र सरकारकडून  ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अडीच हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. कोणताही भेदभाव न करता येथील ऊस खरेदी करणार असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचाच ऊस बारामतीमार्फत खरेदी केल्या जाईल. माजी आ. चंद्रकांत दानवे व राजेश चव्हाण यांच्या रूपाने या विभागाला चांगले नेतृत्व लाभले आहे. उसाच्या बाबतीत राजेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून बारामती कारखाना या परिसारात आणण्यास भाग पाडल्याचेही यावेळी ते बोलत होते. यावेळी राजेश चव्हाण, युवा नेते रामधन कळंबे, पंकज नाना बोराडे, रमेश सपकाळ, शेख कौसर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकर्‍यांची मोठी उपस्थिती होती.