Wed, Nov 21, 2018 20:19होमपेज › Jalna › औरंगाबाद दंगलीची चौकशी करा

औरंगाबाद दंगलीची चौकशी करा

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:20PMजालना : प्रतिनिधी

औरंगाबाद शहरातील दंगलीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तय्यब बापू देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 12 मे रोजी जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कट रचून दंगल घडवण्यात आली. प्रथम दंगलीमधील जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात येतो, अश्रुधूर सोडण्यात येतो व परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्यास फायरिंग केली जाते, मात्र तसे न करता फायरिंग करण्यात आली. यात एक पुरुष, एक मुलगा मृत पावला असून यास सर्वस्वी पोलिस जबाबदार आहेत.