Tue, Nov 13, 2018 21:50होमपेज › Jalna › पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMअंबड : प्रतिनिधी

वाळू माफियांना संरक्षण देणार्‍या आणि त्यासाठी सहकारी फोैजदाराला फोन करून दबाव आणणार्‍या पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे कार्यकर्ते देवानंद चित्राल उपोषणास बसले आहे. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले.

चार दिवसांच्या उपोषणानंतर सोमवारी दुपारी 12 वाजता उपोषणकर्ते देवानंद चित्राल यांची उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनवणे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचे लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली; परंतु चित्राल पोलिस निरीक्षक शेळके यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम होते. वैद्यकीय अधिकारी श्रीमती पी. डी. परे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली; परंतु कुठल्याही वैद्यकीय उपचारांची आपल्याला गरज नसल्याचे चित्राल यांनी लेखी दिले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिस निरीक्षक रफिक शेख व फौेजदार पांडुरंग माने फौजफाट्यासह उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा अहवाल चित्राल यांना दाखवून रुग्णालयात दाखल व्हावेच लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून सलाईन लावण्यात आले.

 

Tags : jalna , jalna news, hunger strike,giving sand mafiya protection, police