Tue, Sep 25, 2018 10:34होमपेज › Jalna › शहागड येथे दीड लाखाचा गुटखा जप्त

शहागड येथे दीड लाखाचा गुटखा जप्त

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:09AMवडीगोद्री : प्रतिनिधी 

अंबड तालुक्यातील शहागड येथील सहारा ट्रेडर्सवर अन्न व औषध विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 21) धाड टाकली आहे. या धाडीत त्यांनी तब्बल दीड लाख रुपये किमती गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने शहागड व परिसरात खळबळ उडाली आहे. 

याविषयीची बातमी 16 मे रोजी दैनिक पुढारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन, जालना यांनी कारवाई केली. शहागड येथील बसस्थानकाजवळ असलेल्या रहीम शेख याच्या सहारा ट्रेडर्सवर सोमवारी दुपारी 12 वाजता अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रज्ञा सुरसे, संजय चट्टे, निखिल कुलकर्णी यांनी धाड टाकून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये गुटखा, सुगंधी मसाला, जर्दायुक्‍त विविध कंपन्यांचा गुटखा होता. अन्नसुरक्षा आयुक्‍त यांनी बंदी केलेला प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याने अन्नसुरक्षा कायदा 2006 नुसार रहीम शेख याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी सांगितले.