Wed, Oct 16, 2019 19:47होमपेज › Jalna › कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Jul 16 2019 6:47PM | Last Updated: Jul 16 2019 3:03PM
हस्तपैखरी : प्रतिनिधी  

अंबड तालुक्यातील हस्तपोखरी  येथील शेतकरी  सोमीनाथ जगन्नाथ गाढे यांनी  गळफास घेवून आज (ता.16) आत्महत्या केली. त्यांनी हस्तपोखरी येथे राहत्या घरी अत्महत्या  केली. रात्री पत्नी, मुले गाढ झोपेत  असताना मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या  केली.

सततची नापीकी, मुलीच्या  लग्नासाठी  घेतलेले  कर्ज,  अंबड  येथील  बँकेचे पीक  कर्ज  व  तोंडावर आलेले दुसऱ्या मुलीचे  लग्न या  जाचाला  कंटाळुन  आत्महत्या   केल्याची माहिती  मयताचे  भाऊ  कृष्णा  गाढे  यांनी  अंबड  पोलिसांना दिली.