Sat, Feb 23, 2019 16:20होमपेज › Jalna › ‘त्या’ बनावट बीटीत आढळले प्रतिबंधित ‘एचटी जिन्स’ !

‘त्या’ बनावट बीटीत आढळले प्रतिबंधित ‘एचटी जिन्स’ !

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 04 2018 2:14AMजालना : प्रतिनिधी

कृषी विभाग व स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने जालना शहरात पकडलेल्या 64 लाख रुपयांच्या बनावट बीटी बियाणांचे 13 नमुने कृषी विभागाच्या वतीने नागपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च येथे पाठविण्यात आले होते. 13 पैकी 9 सॅम्पलमध्ये प्रतिबंधित तणनाशक जिन्स म्हणजेच एचटी जिन्स आढळल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सायप्पा गरंडे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व कदिम जालना पथकाच्या पोलिसांनी कृषी विभागाने दिलेल्या टीपवर कचेरी रोड भागातून कल्पेश टापर याच्या घरावर छापा टाकून 64 लाख 42 हजारांचे अनधिकृत बीटी बियाणे 18 एप्रिल रोजी रात्री पकडले होते. 

राज्यातील सर्वात मोठी कारवाई

राज्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिली होती. कृषी विभागाच्या वतनीने पकडलेल्या 5 हजार 600 पिशव्यांतील 13 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च येथे पाठविण्यात आले होते. नुकत्याच प्राप्‍त झालेल्या तपासणी अहवालात 9 सॅम्पलमध्ये तणनाशक बीटी आढळून आले आहेत.