Mon, May 20, 2019 22:16होमपेज › Jalna › घनसावंगीत मद्यधुंद पोलिसाचा हैदोस 

घनसावंगीत मद्यधुंद पोलिसाचा हैदोस 

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:50AMघनसावंगी : प्रतिनिधी

येथील पोलिस ठाण्याचे महेंद्र गायकवाड याने दारूच्या नशेत शनिवारी (3 मार्च रोजी) रात्री साडेदहाच्या सुमारास महिला कर्मचार्‍याच्या निवासस्थानी जाऊन शिवीगाळ करीत घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर पोलिस ठाण्यातही नासधूस केली. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस कर्मचारी गायकवाड याने शनिवारी रात्री महिला पोलिस कर्मचारी मीरा मुसळे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन शिवीगाळ करण्यास सुुरुवात केली. बंद असलेला दरवाजा तोडला व मुसळे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर पोलिस ठाण्यातील वायरलेस रुममधील संगणकाचा की बोर्ड, माऊससह इतर वस्तूंचे नुकसान केले.