Tue, Apr 23, 2019 01:49होमपेज › Jalna › युवकांनी देशसेवा हेच अंतिम ध्येय ठेवावे : दानवे

युवकांनी देशसेवा हेच अंतिम ध्येय ठेवावे : दानवे

Published On: Jan 29 2018 12:59AM | Last Updated: Jan 29 2018 12:50AMजाफराबाद/भोकरदन ः प्रतिनिधी

आधुनिक युगात जीवन जगत असतांना युवकांनी इतर ध्येयाप्रमाणेच देशसेवा  हेच अंतिम ध्येय डोळ्यांसामोर ठेवावे, असे आवाहन आमदार संतोष दानवे यांनी केले.

जाफराबाद तालुक्यातील भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा सन्मान रॅलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. युवकांनी तिरंगा ध्वज, संविधान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सदैव तत्पर राहून देशाप्रति तिरंग्याप्रति सन्मान जागृत करावा. मागील तीन वर्षांत केलेल्या विविध विकासकामांसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी या मतदार संघात खर्च केला असल्याचे आमदार दानवे यांनी सांगितले.  यावेळी कार्यक्रमाला राजेंद्र देशमुख, गोविंदराव पंडित, शिवसिंग गौतम, शेषराव कळंबे, भगवानराव लहाने, संतोष लोखंडे, शालिकराम म्हस्के, गणेश फुके, साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव, सुरेश दिवटे, चंद्रकांत साबळे, विठ्ठल चिंचपुरे, विलास आडगावकर, विजय परिहार, दीपक जाधव, नाना भागीले, दगडुबा गोरे, निवृत्ती दिवटे, सुधीर पाटील, मधुकर गाढे, साहेबराव मोरे, मनोज शिंदे, जगन पंडित, दादाराव सवडे, राजू साळवे, सुरेश म्हस्के, प्रदीप मुळे, अश्रुबा बोर्डे, चंद्रकांत चौतमल, अरुण अवकाळे, कडुबा शितोळे, अनिल बोर्डे, सय्यद मतीन, अजीम भाई, कदीर टेलर, सचिन जैस्वाल, संदीप वाकडे, अमोल पडघन, विजय सोनवणे, विजय सोनुने, दगडुबा बोरुडे, कैलास वायाळ, राजू खोत, कैलास मोरे, भगवान बनकर, अनिल वरगणे, किशोर वरगणे, रामदास लोखंडे, विनोद पंडित, शरद पंडित आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उद्धव दुनगहू यांनी  तर साहेबराव कानडजे यांनी आभार मानले 

दरम्यान,   भारतीय जनता पक्षाच्या वतीने भोकरदन येथे शुक्रवारी (दि.26) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार संतोष दानवे यांचे         मार्गदर्शनाखाली तिरंगा एकता संमेलन व तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शहरातून निघालेल्या या तिरंगा यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

या कार्यक्रमप्रसंगी आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी यांचे हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तिरंगा एकता यात्रेनिमित्त तिरंगा एकता यात्रा मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी दीपक जाधव, शहराध्यक्ष सतीश रोकडे, नगरसेवक राहुल ठाकूर, दिपक बोर्डे, जि.प.सदस्य सुभाषराव देशमुख, विठ्ठल चिंचपुरे, डॉ.चंद्रकांत साबळे आदी  उपस्थित होते.