Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Jalna › ‘अजिंक्य’मध्ये साकारतोय शेतकर्‍याची भूमिका

परतूरचा योगेश कुलकर्णी आता मोठ्या पडद्यावर

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:27PMपरतूर : प्रतिनिधी

मध्यमवर्गीय कुटुंबातील वडिलांचे छत्र हरवलेल्या योगेशला नाट्य आणि गायनाची आवड. महाविद्यालयात शिक्षणानंतर एम.ए. नाट्यशास्त्रामध्ये पदवी आणि त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या अकादमीमध्ये त्याने नाट्य कलेचे धडे घेतले. छोट्या पडद्यावर मालिका, नाटके सादर करता करता परतूरचा योगेश आता मोठ्या पडद्यावर ‘अजिंक्य’ चित्रपटात शेतकर्‍याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.चित्रपटाचे जद या गावात चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तो चित्रपट ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

योगेश सामान्य कुटुंबातील आहे.वडिलानंतर आई व भावंडांनी त्याचे पालन केले. लालबहादूर शास्त्री शाळेत त्याने  प्राथमिक शिक्षण घेतले. त्याने गायन  व अभिनयाचा छंद जोपासता यावा म्हणून औरंगाबाद विद्यापीठात नाट्यशास्त्रात  प्रवेश घेतला. 

शालेय जीवनात गायन व अभिनय कला सादर केली. त्यानंतर  एकांकिका, नाटक अभिनय करण्याची संधी मिळाली. अभिनयातील कसब पाहून त्याला प्रा. अशोक बनकर यांच्या ‘धर्म ही अफूची गोळी’ या एकांकिका काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका त्याला नवसंजीवनी देणारी ठरली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावरील फकिरा असलम शेख यांच्या नाटकात ‘साधू’ ची भूमिका करण्याची संधी मिळाली. 

नाट्य पदवी घेतल्यानंतर त्याने पुणे गाठले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अकादमीत त्याने प्रवेश घेतला.  विक्रम गोखले यांनी योगेशची महिला सक्षमीकरणावर आधारित दूरदर्शनवरील ‘आवर्तन’ मालिकेसाठी निवड केली. त्या नंतर ‘परफेक्ट संन्यास’ हे नाटक मिळाले. अस्लम शेख यांच्या या नाटकातील वेड्याच्या  भूमिकेने त्याच्या कलेला नवीन तेज दिले. ‘इंटरवल’मधील त्याची शिक्षकाची भूमिकाही गाजली. दिग्दर्शक म्हाळसाकांत कौसडीकर यांनी त्याची पहिल्या मराठी चित्रपटात निवड केली.