Sat, Mar 23, 2019 18:44होमपेज › Jalna › पाणवठ्यांअभावी वन्यप्राण्यांचे हाल

पाणवठ्यांअभावी वन्यप्राण्यांचे हाल

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 11:15PMजालना : प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या दरेगाव व कन्हैयानगर येथील वन क्षेत्रात वन विभागाने पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. विस्तीर्ण अशा वन परिसरात दोन पाणवठे असल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. वन्यप्राणी नागरी वसाहतीकडे पाण्याच्या शोधात येत असल्याचे चित्र लगतच्या वसाहतीत पाहावयास मिळते.

वन विभागाच्या हद्दीत येणारे दरेगाव आणि कन्हैयानगर येथे शेकडो हेक्टर जंगल आहे. या जंगलात हरिण, ससे, लांडगे, कोल्हे, तडस यांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. मात्र कडक उन्हामुळे नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वनविभागाकडूनही पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी भरले जात नाही. यामुळे  वन्यप्राण्यांचा जीव कासावीस आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडले जात होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वन्यप्रेमींतून होत आहे. याशिवाय विस्तीर्ण क्षेत्रात पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची मागणीही वन्यप्रेमींतून होत आहे.