Thu, May 23, 2019 04:44होमपेज › Jalna › जालना रेल्वेस्थानक झाले ‘वायफाय’!

जालना रेल्वेस्थानक झाले ‘वायफाय’!

Published On: Jul 29 2018 1:37AM | Last Updated: Jul 29 2018 1:32AMजालना ः गजेंद्र देशमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया प्रकल्पातील एक भाग म्हणून  जालना  रलवेस्थानकात आता वायफाय सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना 21 एमबीपीएस स्पीड असलेले इंटरनेट वापरता येणार आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेले वायरअंतर्गत ही वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील चारशे रेल्वेस्थानकांवर वायफाय सेवा सुविधा करण्याचे भारतीय रेल्वेने ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील मोजक्याच स्थानकांत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परभणी, नांदेड, औरंगाबानंतर आता जालना स्थानकातही प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे. स्थानकातील फलाट क्रमांक एक तसेच दोनवर वायफाय बॉक्स लावण्यात आले आहेत. ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. रेल्वेचे रेलटेल नेटवर्कद्वारे ही सुविधा देण्यात येत असून तांत्रिक सहकार्य म्हणून गुगल काम पाहत आहे. 

अर्ध्या तासानंतर पुन्हा करावे लागणार लॉगईन : वायफाय सेटिंगमध्ये ओटीपी मिळाल्यावर ही सेवा सुरू होणार आहे. साधारणपणे अर्ध्या तासानंतर ही सेवा बंद पडते. पुन्हा वापर करावयाचा असल्यास पुन्हा लॉगईन करावे लागणार आहे. 

रेल्वेस्थानकात गर्दी वाढण्याचा धोका

वायफाय सेवा सुरू झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांव्यतिरिक्‍त अवांतर नागरिकांची गर्दी वाढण्याची चिंता व्यक्‍त होत आहे. रात्री रेल्वेस्थानकात अनेक  युवक रात्री उशिरापर्यंत थांबलेले असतात. 

हायस्पीड इंटरेनट मिळणार 

रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वे येईपर्यत स्मार्टफोनच्या माध्यमातून हायस्पीड इंटरनेट वापरता येणार आहे. हायस्पीडमुळे व्हिडिओ कॉल, व्हिडिओ गेम, गाणी, विविध फाईल्स तत्काळ डाऊनलोड करता येणार आहे. हायडेफिनेशन व्हिडिओ पाहता  येणार आहेत. सोबतच रेल्वेचे वेळापत्रक, पीएनआर स्टेटस व अन्य रेल्वे शेड्यूल पाहता येणार आहे.