Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Jalna › यंदाच्या बजेटकडून तुम्हाला काय हवंय?

यंदाच्या बजेटकडून तुम्हाला काय हवंय?

Published On: Jan 25 2018 6:00PM | Last Updated: Jan 25 2018 6:12PMदर वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होतो. प्रत्येकासाठी तो निश्चितच उत्सुकतेचा विषय असतो. नोकरदार मंडळी इन्कम टॅक्सच्या स्लॅबकडे लक्ष ठेवून असतात, तर शेतकऱ्यांचे सबसिडीकडे डोळे लागलेले असता. कधी सरकारकडून पदरात काही तरी पडतं, तर कधी कधी झोळी रिकामीच राहते. 

यंदा एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली त्यांच्या पारंपरिक बॅग अर्थात पोतडीतून काय बाहेर काढतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नोटाबंदीनंतर एक वर्ष सरल्यानंतरचा हा अर्थसंकल्प कोणत्या क्षेत्राला उभारी देणार, यासाठी १ फेब्रुवारीची वाट पहावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सर्वांचे समाधान करणारा नसेल, असं यापूर्वीच जाहीर करून टाकलंय. पण, मानवी स्वभावानुसार आपल्या अपेक्षा कायम असतात. तुमच्या अपेक्षांना मोकळी वाट करून देण्यासाठी आम्ही येथे एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.

तुम्हाला फक्त या बातमीच्या खाली असणाऱ्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या अपेक्षा नोंदवायच्या आहेत. तुमच्या सर्व कमेंट्सना अर्थात अपेक्षांना पुढारी ऑनलाईनच्या याच बातमीमध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे. त्यामुळे बजेटकडून असणाऱ्या तुमच्या अपेक्षा कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा.