Tue, Jul 16, 2019 10:12होमपेज › Jalna › जामखेडमध्ये पाणीटंचाई

जामखेडमध्ये पाणीटंचाई

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AM जामखेड : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील जामखेड येथे तीन सार्वजनिक विहिरीत मुबलक पाणीसाठा असतानाही ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. जामखेड येथील पाणीपुरवठा करणारी पाइपलाईन जीर्ण झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. जोगेश्‍वरीवाडी, करडगाव व जामखेड तलावाच्या मागे अशा तीन सार्वजनिक विहिरीद्वारे गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र गावाच्या उशाशी धरण असतानाही नागरिकांना पाणीटंचाईमुळे घशााला कोरड पडत आहे. विहिरींना मुबलक पाणी असले तरी ते ग्रामस्थांच्या घरापयर्र्ंत पोहचत नसल्यामुळे पाणीटंचाईची दाहकता वाढत्या उन्हासोबत वाढू लागली आहे.ग्रामपंचायत कार्यालय पाणीपट्टी वसुलीसाठी आग्रही असताना दुसरीकडे पाणीपुरवठा करण्याबाबत मात्र दुर्लक्ष करीत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. गावात एकही हातपंप चालू नाही. 

Tags :  Water shortage in Jamkhed