Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Jalna › पाणीपातळीत एक मीटरने वाढ

पाणीपातळीत एक मीटरने वाढ

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:32PMजालना : प्रतिनिधी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या  निरीक्षण विहिरीच्या पाणीपातळीत 1 मीटरने वाढ झाल्याची जालनेकरांसाठी सुखद वार्ता आहे. जलयुक्त शिवारामुळे ही वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत टँकरचे प्रमाण कमी झाले आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या एकीकडे कमी होत असतानाच पाणीप्रश्‍नावर शासनाचा होणारा खर्चही कमी झाला आहे.

जिल्ह्यात भूजल विभागाच्या वतीने 2017 मध्ये 110 विहिरींद्वारे करण्यात आलेल्या निरीक्षणात मार्च महिन्यात पाणीपातळी 9.51 मीटर होती. 2018 मध्ये त्यात वाढ होऊन ही पाणी पातळी 10.19 एवढी वाढली. पाणीटंचाईचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पाणीपातळीत झालेली 1 मीटरने वाढ ही लक्षणीय म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यांत भूजल सर्वेक्षण विभागाच्या करण्यात आलेल्या निरीक्षणात जालना तालुक्यात 15 विहिरींत मागीलवर्षी 8.94 मीटरवरून पाणीपातळीत वाढ होऊन ती 8.99 मीटर झाल्याचे दिसून आले. बदनापूर 12 विहिरी 11.48 वरून 12.68, भोकरदन 25 विहिरी 9.16 वरून 9.82, जाफराबाद 13 विहिरी 8.68 वरून 9.84, परतूर 9 विहिरी 9.77 वरून 9.89, मंठा 10 विहिरी 8.56 वरून 9.21, अंबड 12 विहिरी 10.35 वरून 10. 38, घनसावंगी 14 विहिरी 10.14 वरून 10.73 मीटरने पाणीपातळीत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. निरीक्षण करण्यात आलेल्या 110 विहिरींपैकी 76 विहिरींच्या पाणीपातळीत घट तर 34 मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

प्रथमच वाढ                                                             

जिल्ह्याच्या पाणीपातळीत गेल्या कित्येक वषार्र्ंत प्रथमच वाढ झाली आहे. अनेक तालुक्यांत परतीचा पाउस या वर्षी उशिराने पडल्याने  पाणी पातळी टिकून राहण्यास मदत झाली. पाणीपातळीत वाढ होण्यामागे परतीचा पाऊसही जिल्ह्यासाठी फायद्याचा ठरला आहे. गेल्या काही वषार्र्ंपासून निसर्गाचा ढासळलेल्या असमतोलामुळे कृषी उद्योगाला मोठा फटका बसत असतानाच दुसरीकडे जिल्ह्याच्या पाणीपातळीत झालेली वाढ ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे.

Tags : Jalna, Water, level, increased, one, meter