Sun, May 26, 2019 12:35होमपेज › Jalna › गोदामाची भिंत कोसळून 2 ठार, 3 जखमी

गोदामाची भिंत कोसळून 2 ठार, 3 जखमी

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMजालना : प्रतिनिधी

जुन्या मोंढ्यातील गोदामाची जुनी भिंत कोसळल्याने त्याखाली दबून काकासाहेब देवराव कबाडे (50, रा. हिवरा-राळा, ता.बदनापूर), प्रकाश लक्ष्मण खंडाळे (45, रा.गोंदेगाव,ता.जि.जालना) हे ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झाली.

जुन्या मोंढ्यात जागंडा यांच्या दुकानाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाच्या पाया भरण्याचे काम सुरु असतानाच अचानक लगतच्या धोका यांच्या जुन्या गोदामाच्या भिंतीची माती पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण भिंत कोसळली. भिंत कोसळताच परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी अग्निशामक दलाच्या बंबासह जेसीबी मशीन मागविण्यात आली. भिंतीखाली दबलेल्या पाचपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सुधाकर नामदेव लहाने व शिवाजी लहाने  जखमी झाले. घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यासह पालिकेचे मुख्याधिकारी संंतोष खांडेकर यांनी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून जखमी व मृतांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.