Mon, Nov 19, 2018 09:00होमपेज › Jalna › ‘स्वाभिमानी’चा विद्रोही मेळावा 

‘स्वाभिमानी’चा विद्रोही मेळावा 

Published On: Mar 11 2018 1:29AM | Last Updated: Mar 11 2018 1:22AMभारज बु. : प्रतिनिधी 

गावागावात किसान पुत्राची आर्मी उभी करणार, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले

जाफराबाद  तालुक्यातील भारज बु. येथे शुक्रवार 9 मार्च रोजी विद्रोही शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास ‘स्वाभिमानी’च्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम, गजानन बंगाळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे, गजानन नाईकवाडे, घनश्याम चौधरी, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर साळुंखे, मुक्ताराम गव्हाणे, कुलदीप करपे, डॉ. ढोरकुले पाटील, निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, सदाशिव जायभाये, सीताराम उगले, राजेंद्र डोके, काका साबळे, रावसाहेब मालुसरे, रमेश अप्पा रेनगडे, संतोष निकम, भगवान पालकर, स्वाती इंगळे यांची उपस्थिती होती.

तुपकर म्हणाले की, गावपुढार्‍यांची मानसिकता वेगळीच आहे, एखाद्या पुढार्‍याने कार्यकत्यार्र्ंच्या पाठीवर थाप टाकली म्हणजे तो कार्यकर्ता फार पवित्र झाला असा समज करून घेतात, मात्र तुमच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत येथील पुढारी तुम्हाला विकासापासून कोसो दूर ठेवत आहेत. किती दिवस अशा भ्रष्ट नेत्यांच्या नादाला लागून तुमच्या किती पिढ्या तुम्ही बरबाद करणार आहात, अजून वेळ गेलेली नाही सावध व्हा,  सरकारने शेतकर्‍यांना मोठ मोठी स्वप्ने दाखवून फसविले. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. मेळावा यशस्वितेसाठी मयूर बोर्डे, योगेश पायघन, कैलास राऊत, भगतसिंग लोधवाळ, प्रेमसिंग धनावत, पवन पहेलवान, राजेंद्र अंभोरे, अरुण कोर्डे, सूर्यकांत हुसके  भगवान धनावत यांनी अथक परिश्रम घेतले.