Wed, Apr 24, 2019 20:04होमपेज › Jalna › दगड-गोट्यांत हरवला रस्ता

दगड-गोट्यांत हरवला रस्ता

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:25AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

येथील शिवाजी चौकातील सिमेंट रस्त्याचे काम आमदार संतोष दानवे यांचे विशेष निधीतून करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यापासून गावात जाणार्‍या रस्त्याकडे संबंधित गुत्तेदाराने दगड-गोटे टाकल्याने वाहन धारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मागील आठवड्यातच परिसरातील युवकांनी मुख्य रस्त्यावरील दगड गोटे वेचून रस्ता स्वच्छ केला होता. परंतु मुख्य रस्त्याकडून गावात जाणार्‍या रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराने मोठमोठाले दगड गोटे टाकल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण शिवाजी नगर चौकात अस्वच्छता पसरली आहे.  शिवाजी चौकातून गावातील पोलिस स्टेशन ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद शाळा व बाजार गल्ली अशा प्रमुख संस्था असलेल्या मुख्य मार्गाकडे जाणार्‍या रस्त्याला जोडणारा भाग संबंधित गुत्तेदाराने व्यवस्थितरीत्या सिमेंटीकरण न करता त्या ठिकाणी मुरम व दगडगोट्यांचा भरणा केला आहे. रोडला जोडणारा भराव व्यवस्थित नसल्याने दररोज या ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडत  असून मागील आठवड्यातच येथील व्यापार्‍यांनी स्वच्छता केली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर दगडगोटे असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

 याबाबत भाजपचे नेते भास्कर दानवे यांनी संबंधितांना सूचना दिल्या होत्या परंतु त्याची दखल घेतली गेली नसल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य रस्त्यापासून नवीन रास्ता दोन फूट उंच झाला आहे रस्त्याला जोडणार्‍या भागात खड्डे  असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.