Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Jalna › तलावातून पाणी उपसा करणार्‍यांवर कारवाई

तलावातून पाणी उपसा करणार्‍यांवर कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जाफराबाद : प्रतिनिधी

तालुक्यातील भारज बु. येथील तलावातून परिसरातील चार शेती वीजपंपाच्या अवैध चालवण्यात येणार्‍या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. सिंचन विभागांतर्गत स्थापन  करण्यात आलेल्या पथकाने ही कारवाई रविवारी केली. 

या पथकात परिसरातील सरपंच व सदस्य यांचा समावेश आहे. हे पथक राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत असणार्‍या सिंचन शाखा कार्यालयांतर्गत भारज लघु तलावाच्या जलाशयातील अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी नेमण्यात आले आहे. या तलावात दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीसाठा कमी आहे. 

तलावात सध्या 18 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. या तलावावरून परिसरातील भारज बु, भारज खु. कुसळी, अंधारी आणि आढा या पाच गावांना पाणी पुरवठा केला जातो. या तलावातून मागील काही दिवसांपासून विना परवाना अवैध पाणी उपसासाठी वीजपंप जोडण्यात आले होते; परंतु भारज खु. व आढा येथील सरपंच यांच्या विशेष पुढाकारातून पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी गाव पातळीवर गठीत करण्यात आलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. चारही शेती वीजपंप पथकाने जमा करून ताब्यात घेतले आहे. 

यानंतरही अशाप्रकारची धडक कारवाई पथकाद्वारे केल्या जाईल, अशी माहिती शरद गव्हाणे यांनी ‘पुढारीशी बोलताना दिली. या पथकात यू. एस. गायकवाड, काकडे, सरपंच वनिताबाई गव्हाणे, सदानंद घोडके, सुधाकर दांडगे, उमेश रहेकवार, अतीष तारू, अनिल तारू, अनील दांडगे, समाधान गव्हाणे, कृष्णा हुस्के,  शेषराव दांडगे, कैलास फुसे, भानुदास कन्नर, सरपंच गजानन काळे, शरद गव्हाणे यांचा समावेश आहे.


  •