Fri, Feb 22, 2019 16:00होमपेज › Jalna › कंटेनर-मोटारसायकल अपघातात दोन ठार 

कंटेनर-मोटारसायकल अपघातात दोन ठार 

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMजालना : प्रतिनिधी

मोतीबागेजवळ कंटेनर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना रविवार, 20 एप्रिल रोजी घडली. महादेव दामू वैद्य (23) व गौरव सुभाष वैद्य (25) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही चुलतभाऊ आहेत.

मोतीबागेसमोरून जाणार्‍या वळण रस्त्यावर भरधाव कंटेनर (एच.आर. 65-ए 5651)  व मोटारसायकल (एम.एच.21-ए-5651) ची रविवारी दुपारी समोरासमोर धडक झाली. अपघातात अंबड तालुक्यातील शिरनेर येथील महादेव दामू वैद्य (23) व गौरव सुभाष वैद्य (25) या दोघा चुलतभावांचा मृत्यू झाला.  दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातग्रस्त  मोटारसायकलची टाकी व समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले. 

कंटेनरच्या समोरच्या भागावर अपघातातील मृतांचे मांस चिकटल्याचे विदारक चित्र अपघातस्थळी दिसून आले. अपघातग्रस्त तरुणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने काही काळ ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. 

वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर व मोटारसायकल पंचनामा करून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक शेजूळ यांच्यासह जमादार विलास शिंदे, आर.एन. जोधंळे, शे. खलील, खार्डे, चित्राल, सुरडकर, जाधव, एस.सी. जाधव, वाटुरे, पी.एम. झाले, जी.एन. तेजनकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात घडताच ट्रक जागेवर सोडून चालक पळून गेला. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.