Mon, Sep 24, 2018 05:49होमपेज › Jalna › तिघी मैत्रिणींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

तिघी मैत्रिणींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:01AMघनसावंगी : अविनाश घोगरे 

तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघुसिंचन तलावात बुडून मृत्यू झालेल्या तीन मैत्रिणींवर तलावाकाठी एकाचवेळी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान, बचावलेल्या मुलींनी आपबीती सांगितली.

दुर्दैवी घटनेत जना भानुदास रनमळे व मनीषा भानुदास रनमळे या सख्ख्या बहिणी आहेत. यात जना हिचा मृत्यू झाला तर मनीषा वाचली. कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संगीता, जनाबाई, सौमित्रा, मनीषा व कल्याणी आम्ही मनमिळावू मैत्रिणी होतो.आम्ही कधी विचार पण नव्हता केला असे एकमेकीना सोडून जायचे. पण आज त्या तिघी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या हे  सांगताना कल्याणीला आश्रू अनावर झाले होते. लघु तलाव गावाला लागूनच असल्यामुळे या ठिकाणी दरोज महिला कपडे धुण्यासाठी येतात. या मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. 

तलावत 50 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खदाणीचा अंदाज येत नाही. कमी पाण्यामुळे लगेच खदाण लागल्यास अशा घटना घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तलावाकाठी धोबी घाट बांधल्यास महिला तेथेच कपडे धुतील. यापूर्वीही दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.