Wed, Nov 14, 2018 08:21होमपेज › Jalna › आदिवासी समाजाचा मोर्चा

आदिवासी समाजाचा मोर्चा

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:11AMजालना : प्रतिनिधी

आदिवासी समाज बांधवाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 4) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकरांनी पारंपरिक वेशभूषा करत लक्ष वेधून घेतले.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यात प्रामुख्याने शंबरी आर्थिक विकास महामंडळ कायम ठेवून त्यांची शाखा जिल्हानिहाय सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन पंचनामे केल्यानंतर जात प्रमाणपत्राचे वाटप करावे. 

गायरान जमीन कसणार्‍या आदिवासींच्या नावावर सातबारा करण्यात यावा. आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी 1951 ची लावलेली खासरा पाहणी पत्रक ही जाचक अट रद्द करण्यात यावी, राज्यातील आदिवासींना दारिद्य्र  रेषेखाली सामावून घेणे. आदिवासी वाड्यांवर स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी. आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह बंद करण्यात येऊ नये. जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा करण्यात यावी. तसेच त्या पीडित मुलीस शासनाकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वेताळ, मराठवाडा अध्यक्ष  प्रल्हाद दळवी, जिल्हाध्यक्ष नितेश बरडे, तालुकाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.