Fri, Aug 23, 2019 22:12होमपेज › Jalna › धनादेश अनादर : तीन महिने साधी कैद

धनादेश अनादर : तीन महिने साधी कैद

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 12:20AMटेंभुर्णी :  प्रतिनिधी

कर्जफेडीसाठी देवगिरी नागरी पतसंस्थेस दिलेला धनादेश अनादर झाल्याने जाफराबाद तालुक्यातील पोखरी येथील बळीराम शिंदे यांना न्यायालयाने तीन महिने साध्या कैदेची शिक्षा व 81 हजार 663 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

तालुक्यातील पोखरी येथील बळीराम अंबादास शिंदे यांनी देवगिरी नागरी सहकारी पत संस्थेच्या जाफराबाद  शाखेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी पतसंस्थेच्या हक्कात शिंदे यांनी जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याचा 50 हजार 500 रुपयांचा धनादेश दिला होता. पतसंस्थेच्या वतीने कर्ज वसुलीसाठी धनादेश बँकेत जमा करण्यात आला. मात्र तो धनादेश पैसे नसल्याने परत आला. चेकचा अनादर झाल्यामुळे पतसंस्थेकडे धनादेश मेमोसह जमा करण्यात आला. त्यानंतर कर्जदाराविरुद्ध कायदेशीर बाबींची पूर्तता करून देवगिरी नागरी पतसंस्थेचे वसुली अधिकारी तथा व्यवस्थापक रमेश पाठक यांच्यामार्फत जाफराबाद न्यायालयात बळीराम शिंदे यांच्या विरुद्ध कलम 138 तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणात पतसंस्थेच्या वतीने दोन साक्षीदारांनी साक्ष दिली. शाखेचे व्यवस्थापक यांनी योग्य कागदपत्रे पुरावे उपलब्ध करून दिल्याने या प्रकरणी कर्जदार दोषी आढळून आला. न्यायालयाने कर्जदार बळीराम शिंदे यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा व 81 हजार 663 रुपयांचा दंड ठोठावला. दंड  न भरल्यास तर पुन्हा दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.