Mon, Nov 19, 2018 04:15होमपेज › Jalna › समाधान योजनेचा तीन लाख जणांना होणार लाभ

समाधान योजनेचा तीन लाख जणांना होणार लाभ

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMजालना : प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राज्यात राबविण्यात येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परभणीत 19 एप्रिल रोजी समाधान शिबिरात जवळपास तीन लाख लाभार्थ्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.समाधान शिबिराच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत घनसावंगी येथील तहसील कार्यालयात सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत लोणीकर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार विलास खरात, रामेश्वर भांदरगे, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, सुनील आर्दड, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, केशव नेटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी, तहसीलदार बिपीन पाटील, तहसीलदार अश्विनी डुमरे, अंबडचे तहसीलदार  भारस्कर, देवनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. 

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजना आहेत. सर्वसामान्यांना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील बर्‍याच घटकांना माहिती नसल्याने या योजनेपासून ते वंचित राहतात. शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ वंचितांना व्हावा यासाठी परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात हे शिबीर शहरी व ग्रामीण भागात गत दोन वषार्र्ंपासून राबविण्यात येत आहे.  शिबिराच्या माध्यमातून लाखो गोरगरिबांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सुटण्याबरोबरच त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश आले असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. आढावा बैठकीस जालना, अंबड व घनसावंगी विभागीय सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags : Jalna, Three, lakh, people, benefit, solution, plan