Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Jalna › कुत्र्यासह तीन वासरांचा फडशा

कुत्र्यासह तीन वासरांचा फडशा

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 25 2018 11:55PMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात गत आठवडाभरापासून बिबट्याची दहशत कायम आहे. वनविभागाला बिबट्या सापडत नसल्याने जनावरांचा जीव जात असल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पिंजरा लावूनही बिबट्या सापडत नसल्याने वातावरण भयभीत आहे. बुधवारी एक कुत्रा व दोन वासरांचा फडशा बिबट्याने पाडला. परिसरात दहशत कायम आहे.

बिबट्याने एक कुत्री, एकूण तीन वासरांचा फडशा पाडला आहे. गुरुवारी (दि. 24)  शोभानगर येथील व सखाराम ज्ञानदेव काकडे, मंदाबाई भागवत काकडे, गणेश उत्तम मारेकर हे गट नंबर 27 मधील शेतातून सायंकाळी 5:30 वाजता उसाला पाणी देऊन घरी जात असताना त्यांना बिबट्या दिसल्याचे ते सांगतात. बिबट्या उसात लपल्याचे शेतकरी सांगतात. 26 मे रोजी सकाळी 5:30 वाजता बिबट्याने वासराचा फडशा पाडला. शेतकर्‍यांच्या जनावरांची बिबट्याने शिकार केली असून, त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची मागणी होत  आहे. याविषयी वनपाल पी. सी. विठोरे म्हणाले,  बिबट्या किंवा अन्य हिंस्र प्राणी असू शकतो. त्यासाठी आम्ही पिंजरा आणून बसवला आहे. तो प्राणी पकडण्याचे काम सुरू आहे.