होमपेज › Jalna › आठवड्याभरात पीक विम्याचे 3 कोटी मिळणार 

आठवड्याभरात पीक विम्याचे 3 कोटी मिळणार 

Published On: Jun 11 2018 12:40AM | Last Updated: Jun 10 2018 11:57PMतीर्थपुरी : प्रतिनिधी

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत नऊ हजार खातेदार असून  8500  शेतकरी  खातेदारांनी आपला पीकविमा भरला होता. या विम्यापोटी शेतकर्‍यांना 3 कोटी 4  लाख रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती  बँकेचे मॅनेजर पी.ए.गोरे  दिली. 

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची रक्कम जमा झाली असून येत्या आठवडाभरात  शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांना वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गतवर्षी खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांनी कापूस तूर, सोयाबीन, मूग व उडीद पिकांचा पीकविमा भरला होता. परंतु पिकविम्याची रक्कम कमी मंजूर झाल्याने शेतकरी नाराज झाला. मंजूर पिकविमा चांगला मिळेल अशी आशा होती; परंतु या पिकाला दर कमी मिळाल्याने शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे कमी मिळणार आहेत.