Fri, Apr 19, 2019 12:37होमपेज › Jalna › अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:39PMधावडा : प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील डोंगरात तरुणावर रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला. जखमी तरुणाला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.  

धावडा येथील शेतकरी तुकाराम लेनेकर मेह्गाव (ता. भोकरदन) येथील डोंगरातील चौकी शिवारात  गट क्र. 112 मधील शेतात वाखारीवरून सकाळी 6 वाजेच्या सुमारास  दोन मुलांसह पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी झुडपात लपून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाला हुसकावून लावण्यात येत असतानाच त्याने संतोष लेणेकर (33) या तरुणावर हल्ला केला. त्यात अस्वलाने संतोषच्या पोटाला, हाताला व पायाला चावा घेऊन जखमी केले. लेनेकर व त्यांचा मुलगा गजानन यांनी संतोषला धावडा येथे बैलगाडीतुन आणून खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याला बुलढाण्याला हलविण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. वनरक्षक जाधव, वनपाल दोडके, वनमजूर युवराज बोराडे यांनी जखमींची विचारपूस करून घटनेचा  पंचनामा केला. परिसरात पाण्याची टंचाई असल्यामुळे धावडा, मेह्गाव, वाढोणा, वडाळी, वडोद तांगडा या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर 
वाढला आहे.