Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Jalna › शेतकर्‍यांसमोर कापूस लागवड बियाणांचा प्रश्‍न

शेतकर्‍यांसमोर कापूस लागवड बियाणांचा प्रश्‍न

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 25 2018 12:20AMतीर्थपुरी : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यांमध्ये सध्या विविध भागांमध्ये कापूस लागवडीसाठी जमिनीची मशागत सुरू आहे. पावसाळा अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. मात्र गतवर्षी बोंडअळीच्या धास्तीने  सध्या शेतकर्‍यांच्या मनामध्ये कापूस बियाणांची भीती आहे.मागील वर्षी कापसाच्या बियाणांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते, परंतु यंदाच्या वर्षी कापूस बियाणांची निवड व लागवड करणे हा शेतकर्‍यांसमोर  गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे .कापूस बियाणे खरेदी करून लावणी करणे, परंतु बियाणे चांगली की खराब याची शाश्वती मात्र शेतकर्‍यांना मिळत नसल्याने शासनाने नुकसानीची हमी घेऊन शेतकर्‍यांना कापसाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकर्‍यांमध्ये चर्चा आहे.

सध्या कपाशीचे बीटी वाण विक्री करण्यासाठी विविध कंपन्यांची वाहने गावोगावी कापूस बियाणांची जाहिरात व कृषी दुकानदारांना बियाणांचे बुकिंग करत आहेत. आपल्याच बियाणांची निवड करावी यादृष्टीने प्रचार व प्रसार करत आहेत. मात्र शेतकर्‍यांना आता मागील वर्षीच्या बियाणांमध्ये बोंडआळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस  बियाणावर विश्‍वास नाही. बियाणे लागवड केल्यावर उत्पादन न निघाल्यास संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसार भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. शासनानेही दर्जेदार बियाणे शेतकर्‍यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतक्यांतून जोर धरत आहे.
गतवर्षी बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे करून चार महिने झाले तरी शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. यंदा बियाणे कोणते खरेदी करून लावावे असा प्रश्न मनामध्ये पडला आहे. शेतकर्‍यांचे  नुकसान होऊन म्हणून शासन व बियाणे उत्पादकांनी काळजी घ्यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी  महादेव चिमणे यांनी केली.

Tags : Jalna, question,  cotton, cultivation, seeds,  front,  farmers