Thu, Jul 18, 2019 21:37होमपेज › Jalna › मंठा नळयोजनेचा वीजपुरवठा खंडित 

मंठा नळयोजनेचा वीजपुरवठा खंडित 

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMमंठा : प्रतिनीधी 

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नळयोजनेचा वीजपुरवठा महावितरणने तिसर्‍यांदा खंडित केला. पाणीटंचाईमुळे मनसेच्या वतीने मडके फोड आंदोलन करून नगर पंचायतीचा निषेध करण्यात आला.
मुख्याधिकारी गैरहजर असल्याने पाणीपुरवठा सुरळीत कसा होणार याची चिंता नागरिकांना लागली आहे. शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याने  (दि. 15) रोजी मंठा नगर पंचायतवर मटकी फोड मोर्चा काढण्याचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

मंठा शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी 15 कोटी  67 लाख रुपयांची योजना मागील वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली. ही योजना चालविण्यासाठी दरमहा साडेतीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत ही नळयोजना सुस्थितीत चालविण्यासाठी नळपट्टीची वेळेवर वसूली करणे गरजेचे आहे. तसेच अवैध नळधारकांबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. आजमितीला शहरात तीन हजारांपेक्षा जास्त नळधारक असले तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध नळधारक आहेत. आजपर्यंत एकाही बोगस नळधारकांवर कारवाई करण्यात आली नाही. नळपट्टी किती आणि कधी आकारायची याविषयी धोरण निश्चित नाही. एकीकडे वसूली शून्य आणि दुसरीकडे दरमाह साडेतीन ते चार लाख रुपये खर्च याचा ताळमेळ कसा बसवायचा याविषयी धोरण नसल्यामुळे हा पांढरा हत्ती कसा आणि किती दिवस पोसायचा हा खरा प्रश्न आहे.