Fri, Jul 03, 2020 21:14होमपेज › Jalna › चाकूचा धाक दाखूवन ५० तोळे सोने आणि ७ लाख लंपास

चाकूचा धाक दाखूवन ५० तोळे सोने लंपास

Published On: Aug 10 2019 1:08PM | Last Updated: Aug 10 2019 12:42PM
वडीगोद्री (जि. जालना) : पुढारी ऑनलाईन

शहागड येथील प्रतिष्ठित व्यवसायिक मनोज माणिक जैस्वाल यांच्या घरी चार ते पाच चोरट्यांनी धुमाकुळ घातला. घरातील लोकांना चाकूचा धाक दाखुवन कपाटातील ५० तोळे सोने व ७ लाख लंपास केल्याची घटना काल (दि.९) रात्री १२च्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी स्वयंपाक घराची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश केला. खोलीत झोपलेले भाऊ बहीण व आई यांना चाकूचा धाक दाखवून कपाटातील ५० तोळे सोने आणि रोख रक्कम ७ लाख रुपये चोरले. या घटनेमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर,पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वान पथक, ठसे तज्ञ दरोडा प्रतिबंध पथक यांनी रात्री येऊन चौकशीला सुरूवात केली आहे.