होमपेज › Jalna › कंत्राटदारास 14 लाखांचा दंड करा : लोणीकर

कंत्राटदारास 14 लाखांचा दंड करा : लोणीकर

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:54PMजालना : प्रतिनिधी

विदर्भातील भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत कमी वेळात पोहोचता यावे यासाठी शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-मंठा -परतूर-आष्टी -लोणी -माजलगाव  तसेच वाटूर-मंठा -परभणी या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  या  कामाला गती देण्यासाठी व विविध अडचणी दूर करण्यासाठी शनिवार, 21 रोजी पालकमंत्री बबन  लोणीकर यांनी आष्टी ते परतवाडीदरम्यान  रस्त्याच्या कामास अचानक भेट देऊन पाहणी केली. वेळेत काम न करणार्‍या गुत्तेदारास प्रतिदिन 14  लाखांचा दंड आकारण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. काम वेळेत व दर्जेदार करावे असेही त्यांनी सांगितले.

शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग दोन हजार कोटी रुपये खर्चून करून करण्यात येत आहे. परतूर मतदारसंघात या रस्त्याची लांबी 95 कि.मी. आहे. या  रस्त्याचे काम मेगा इंजिनियरिंग व इन्फ्रा कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले आहे. ऑगस्ट 2017 ला कामास सुरुवात झाली असून  संपूर्ण रस्ता  त्यांना 30 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. मार्च अखेरपर्यंत 20 कि.मी. चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंत्राटदार कंपनीस देण्यात आले होते; परंतु कामावर कार्यरत मशिनरीची पाहणी  करून गती वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रसामग्रीच्या संख्येत वाढ करण्याबाबतची सूचना  लोणीकर यांनी केली. यावेळी सहायक अभियंता सुरजितसिंह, मेघा इंजिनिअरिंगचे  चंद्रशेखर, मधू, आष्टी पोलिस ठाण्याचे ईज्जवार, भाजप तालुकाध्यक्ष रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Tags : Jalna, penalty, contractor, 14, lakh, rupees