Sun, Nov 17, 2019 13:54होमपेज › Jalna › रेल्वेतून उतरताना प्रवाशी जखमी

रेल्वेतून उतरताना प्रवाशी जखमी

Published On: Jun 22 2019 2:41PM | Last Updated: Jun 22 2019 2:29PM
जालना :  प्रतिनिधी

रेल्वेतून खाली उतरत असताना अचानक रेल्वेच्या खाली आल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला. संजय साळवे (रा.खांडवी, ता. परतूर) असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संजय साळवे हे हायकोर्ट रेल्वेने परतूर येथून रांजणी येथे आले होते. यावेळी साळवे रेल्वे स्थानकावर उतरत असतांना ते अचानक रेल्वे खाली पडले. या अपघातात साळवे यांच्या उजव्या पायाचा पंजा पायापासून वेगळा झाला असून उजव्या हाताचा मोठी इजा झाली. तर डोक्याला देखील गंभीर दुखापत होवून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी रेल्वेतील प्रवासांसह रांजनी स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन साळवे यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यासाठी मदत केली.