Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Jalna › जिल्ह्याला यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

जिल्ह्याला यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:04PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात 2018 वर्षाकरिता विविध शासकीय कार्यालयांना 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देेण्यात आले आहे. गतवर्षी 8 लाख 50 हजार 712 वृक्ष लागवड करण्यात आले होते. मात्र त्यातील किती जगली हा संशोधनाचा विषय आहे.जिल्ह्यात 2018 वर्षाकरिता कृषी विभागास 5 लाख 24 हजार 330, नगर विकास 34 हजार 540, सार्वजनिक बांधकाम 34 हजार 455, जलसंपदा 6 हजार 890, उद्योग 34 हजार 455, उच्च व तत्रंशिक्षण 3 हजार 445, गृह विभाग 19 हजार 380, सार्वजनिक आरोग्य 1895, ऊर्जा 6 हजार 890, गृह परिवहन 1 हजार 725, जलसंधारण 6 हजार 890, महसूल 17  हजार 660, ग्रामविकास विभाग 1 लाख 18 हजार 400 आदी विभागांना वृृक्ष लागवड उद्दिष्ट देण्यात आले.गतवर्षी 2018 मध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान 8 लाख 50 हजार 712 वृक्ष लागवड करण्यात आले होती. कार्यक्रम कागदावरमात्र वृक्ष लागवडीनंतर त्याचे संगोपन केले जात नसल्याने वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम केवळ कागदावर होत असल्याचे दिसत आहे. वृक्ष लागवडीवर मोठा निधी खर्च होऊनही हा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याने जिल्ह्यातील वृक्ष संगोपनाचा विषय चर्चेत आहे. 

जंगल केवळ 2 टक्के

जिल्ह्यात अवघे 2 दोन टक्के एवढेच जंगल शिल्‍लक असल्याने कुर्‍हाडबंदी करण्यात आली आहे, तरीही शहरात जवळपास पंधरा ते वीस आरा मशीन बिनभोबाट सुुरू असल्याने कुर्‍हाडबंदी व वृक्ष लागवड फार्स ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस ‘वृक्ष वल्‍ली आम्हा सोयरे’चे फलक विद्यार्थ्यांच्या हातात दिले जातात. वृक्ष दिंडी काढल्यामुळे केवळ देखावा निर्माण करता येईल मात्र वृक्ष लागवडीचा खरा उद्देश्य साध्य होणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.