Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Jalna › फळांच्या राजाला रसायनांचा विळखा

फळांच्या राजाला रसायनांचा विळखा

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 25 2018 11:57PMमंठा : प्रतिनिधी

सर्व फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे, परंतु आंबा पिकविण्यासाठी सध्या घातक रसायनांचा वापर केल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन व मंठा नगर पंचायतीने लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.

आंबा पिकविण्यासाठी घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याने फळांचा राजा असलेल्या आंबा विषारी होत चालला आहे. पूर्वी आंबा पिकविण्यासाठी तण, गवत किंवा पळसाच्या  पानांचा, गव्हाच्या भुसाचा वापर केल्या जायचा. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. मात्र, आता झटपट आंबा पिकविण्यासाठी तसेच अधिकचा नफा कमविण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेत आंब्यातील नैसर्गिक गुणधर्म लुप्त होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर करीत असल्याने मानवाला अनेक आजार जडत आहेत.उन्हाळ्यात आंब्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. पाहुण्यांसाठी पाहुणचार म्हणून आंब्याच्या रसाची मेजवानी दिली जाते, पण आंबा पिकविण्यासाठी स्थानिक द्रव्याचा किंवा कारपेटचा वापर करण्यात येतो. सदर पदार्थ मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून त्याकडे जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासनाचे व दुर्लक्षामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत.

पिकूनही गावरान ‘आंबा’ आंबटच 

तालुक्यातील अनेक गावे पूर्वी आमराईसाठी प्रसिद्ध होती, परंतु अनेकांनी सदर आंब्याची मोठाली झाडे तोडल्याने यंदाच्या वर्षी गावरान आंबा सहज मिळणे दुरापास्त झाले आहे. एरवी उन्हाळ्याच्या दिवसांत सहज मिळणारा गावरान आंबा यदांच्या वर्षी झालेल्या अवैध वृक्षतोडीमुळे मिळणे कठीण झाले आहे. यंदा गावरान सहज मिळत नसल्याने ‘आंबा पिकला तरी आंबटच’ असल्याचे बोलत आहे.