Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Jalna › जालन्याच्या ज्वारीला गुजरातमधून मागणी

जालन्याच्या ज्वारीला गुजरातमधून मागणी

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:20AMजालना ः प्रतिनिधी

येथील नवीन मोंढ्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून हरभर्‍याच्या भावात अचानक तेजी आली असून भाव 700 रुपये प्रतिक्‍विंटलने वाढले आहे. हरभरापाठोपाठ गव्हाच्या भावातही वाढ झाल्याने बाजार तेजीत असल्याचे दिसत आहे. ज्वारीलाही गुजरातमधून मागणी वाढल्याने बाजार तेजीत आहे. 

मोंढ्यात पावसामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या मालाची आवक थंडावली आहे. मोंढ्यात हरभराची आवक कमी झालेली असतानाच  मागणी  वाढल्याने भावात प्रतिक्‍विंटल 700 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दररोज आवक 300 ते 400 पोत्यांची होत असून भाव प्रतिक्‍विंटल 3800 ते 3950 असल्याची माहिती आडत व्यापारी संजय कानडे यांनी दिली. गव्हाची आवक कमी झाल्याने फ्लोअरमील गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या आवक दररोज 200 ते 300 पोत्यांची असून भाव प्रतिक्‍विंटल गहू फ्लोअरमील भाव 1850 ते 1950, गहू लोकवन 1950 ते 2100,गहू (496) 2000 ते 2200 असे आहेत. आगामी काळात गव्हाच्या भावात तेजी येण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली.

मोंढ्यातील ज्वारीला गुजरातमधून मागणी वाढल्याने ज्वारीचे भाव तेजीत आहेत. बेस्ट ज्वारीला पुणे, मुंबई, नाशिक व नगर येथून गेल्या महिन्यापासून मागणी होत आहे. मोंढ्यात हलक्या ज्वारीचे भाव प्रतिक्‍विटल 1600 ते 1800, ज्वारी मध्यम 1800 ते 2000, ज्वारी दूध मोगरा 2000 ते 2300 प्रतिक्‍विंटल असल्याची माहिती आडत व्यापारी नंदकिशोर व रामनारायण अग्रवाल यांनी दिली.