Tue, May 21, 2019 18:58होमपेज › Jalna › गाडीवाले, हातगाडीवाले एकाच रांगेत बसवले 

गाडीवाले, हातगाडीवाले एकाच रांगेत बसवले 

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:26AMअंबड : प्रतिनिधी

 याला म्हणतात जिवंत सभा, ही गर्दी, हे मुखवटे, या रणरागिणींचे चेहरे पाहताच लक्षात येते हे पैसे देऊन आणलेले लोक नाहीत. स्वयंस्फूर्तीने आलेली जनताजनार्धन आहे. या विकासप्रिय पार्टीवर प्रेम करणारे मतदार आहेत. येणार्‍या 27 तारखेस आपले अमूल्य मत आमच्या पारड्यात टाकून विजयी करतील हे सिद्ध झाले आहे, असे उ्दगार महिला, बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंबड येथील पालिकेच्या भाजप-रासपा युती उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना  केले.

   यावेळी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलासबापू खरात, जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादरंगे, माजी महापौर भागवत कराड,आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना त्या म्हणाल्या  मोदीजींनी गाडीवाले हातगाडीवाले एकाच रांगेत बसवले आहे ज्यांनी इतके वर्ष सामान्य जनतेस लुटले त्यांची आता ओकायची वेळ आली सर्वसामान्याचें दिवस आले असून मोदीजींनी अशी व्यवस्था केली कु गरीबाला  महत्व आले चोरांची काळ्या धनवाल्यांची फजिती झाली मोदींनी जनधनची योजना गरीबासाठी उज्वला गॅस योजना असे महत्वाचे उपक्रम राबविले काळेधन  सरकारी तिजोरीत जमा झाल्यास पूर्ण राज्याचा विकास होणार आहे 

सभेत बोलता बोलता भावनिक मुद्दयावर त्यांनी हात घातला भगवान गडावर माझ्या विरोधात कट रचण्यात आला मला गडावर येण्यास मनाई करण्यात आली हे माझ्या घरचेच आहे दोन व्यक्ती सोडून या पाठीमागे कोणीही नाही बाहेरच्याची काय हिंमत माझ्या विरोधात जायायची मी मुंढे साहेबांच्या वारसा ,वसा पुढे नेत आहे मोठं मोठ्या पट्टीतील राजकारण्यांच्या सानिध्यात मोठी झाले वाढले माझ्या राजकारणाचा चढउतार मी या डोळ्यांनी पहिला आजच्या  राजकारनाला जातीय रंग दिले जात आहे आपआपल्या जातीचे नाव घेऊन जर राजकारण केले जात असेल तर याचे नुकसान सर्वांना भोगावे लागेल 

यादेशातील प्रत्येक मुसलमान हा देशभक्त आहे मोदीजींनी जो नारा दिला सबका साथ सबका विकास हे यातच सर्व काही दिसून येते येणार्‍या 27 तारखेस आपण आम्हाला भरघोस मतदान करून विजयी करा.  राष्ट्रवादीच्या विध्यमान नगरसेवक राजू सावन्त यांची भाजपात प्रवेशाची तयारी शेवटच्या क्षणात बारगळी गेल्या दोन दिवसा पासून नाराज झालेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू सावंत यांची भाजपात प्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याची बातमी कळताच राजेश टोपेंकडून चक्र फिरण्यास सुरवात झाली राष्ट्रवादीची प्रमुख मंडळी सकाळ पासूनच सावंत यांच्या घरी ठाण मांडून होती.
 त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले नगरसेवकांच्या जवळच्या पाहुणे रावळे यांना जमवून राजू सावंत यांच्यावर दबाव टाकण्यात आला  नगरसेवकांचे काही नातेवाईक राजेश टोपे याच्या संस्थेवर कार्यरत आहेत.