Sun, Mar 24, 2019 17:03होमपेज › Jalna › लोकशाही टिकविण्याचा भार युवकांवर 

लोकशाही टिकविण्याचा भार युवकांवर 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:04AMजालना : प्रतिनिधी

भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे. ती अबाधित ठेवण्याची जबाबदारी देशातील युवकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले आहे.

येथील जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी सुराणा बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जवाहर काबरा होते. व्यासपीठावर डॉ.नारायण बोराडे, डॉ. गणेश अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी आम्ही राजेशाही पहिली. त्यानंतर इंग्रजांचे राज्य आणि आज आम्ही लोकशाही गणराज्य आहोत. भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक नागरिकांचे स्वतंत्र आणि समता हे नैसर्गिक हक्क अबाधित ठेवते. महात्मा गांधी यांनी देशात स्वातंत्र्याबरोबर  स्वराज्य यावर भर दिला होता, मात्र; आजही स्वराज्यासाठी आम्ही सक्षम नाहीत असे ते म्हणाले.  व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य जोपासण्यासाठी संविधानाचा जाहीरनामा प्रत्येकाने जोपासला पाहिजे. सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य काबरा म्हणाले की,  भारतीय संविधान प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणे कर्तृत्व पार पाडली तर देशाचे भवितव्य सुंदर असेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. तर आभार डॉ. वसंत पवार यांनी मानले. या प्रसंगी डॉ. सुजाता देवरे, डॉ. शिवकुमार सोळुंके, डॉ. के. जी. सोनकांबळे, डॉ. व्ही बी उगले, प्रा. सतीश लोंढे, प्रा. गजानन देशमुख, प्रा. लक्ष्मण दळवे, डॉ. बाबू तोटरे, डॉ. प्रवीण वाघमारे, डॉ. प्रवीण चंदनशिवे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.