Sun, Mar 24, 2019 04:13होमपेज › Jalna › बंदीतही मंठ्यात तंबाखूयुक्त सुपारीची विक्री जोरात

बंदीतही मंठ्यात तंबाखूयुक्त सुपारीची विक्री जोरात

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMमंठा :  प्रतिनिधी 

सुगंधित तंबाखू व गुटख्यावर बंदी असतानाही मंठा शहरासह तालुक्यात दररोज लाखो रुपयांच्या तंबाखूयुक्त सुपारीचा  गुटखा ( खर्रा ) फस्त केला जात आहे. पानटपर्‍यांसह किराणा दुकानांतून राजारोस विक्री केलेला गुटख्यावर बंदी असल्याचे कोठेही दिसत नाही. 

मंठा शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत 50 टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे धक्‍कादायक चित्र आहे. यातील 10 टक्के महिलाही तंबाखूजन्य पदाथार्र्ंच्या आहारी गेल्याने तोंडाच्या आजारात वाढ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात जवळपास शंभरच्या वर पानटपर्‍या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते.  किराणा दुकानांमधूनही हे पदार्थ विकले जातात. यातील काही पानटपर्‍यांमधून दररोज 200 ते 300 सुपारीचा गुटखा ( खर्रा )विक्री केला जात असल्याचे दिसून येते. गल्लीबोळातील पानटपर्‍यांमधून खर्‍यासह गुटखा विकला जातो. या माहितीवरून सरासरी 100 खर्रे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खर्‍याची किमत 10 ते 20 रुपये आहे. याप्रमाणे  पानटपरीमधून दररोज लाखोंचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी 13 वर्षांचे मिसरुड  न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्किट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क गुटखा (खर्रा) चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणार्‍यांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो.

विशेष म्हणजे, शासनाने तंबाखू युक्त सुपारीवर विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकार दिले आहे. असे असले तरी तंबाखू व त्याचे गुटखा ( खर्रे )सर्रास विकले जात आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे.