Wed, Jul 17, 2019 20:28होमपेज › Jalna › पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याचा पदाधिकार्‍यांचा आरोप

शिवसेनेचा उपजिल्हाधिकार्‍यांना घेराव 

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:12PMजालना : प्रतिनिधी

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकर्‍यांना पेरणीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. परंतु बँकांकडून शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे, असा आरोप करीत  शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना घेराव घातला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन दिले. 

यावेळी शिवेसनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, भगवानराव कदम, हनुमान धांडे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, अ‍ॅड. भास्कर मगरे, सविता किवंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ पीक कर्ज देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात बोंडअळीने ग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु संबंधित तलाठ्यांनी हंगामी, बागायत पिकांऐवजी जिरायत कापूस पिकांचे नुकसान दाखविले. तलाठ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता कोरडवाहू कपाशी पीक दाखवून हंगामी बागायत पिकास हेक्टर 13 हजार 600 रुपये प्रमाणे अनुदान मिळाले असते. अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे 6 हजार 800 रुपये प्रमाणे मिळणार आहे.याचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे.