Sat, Jul 20, 2019 11:27होमपेज › Jalna › एटीएसने जालन्यातून संशयिताला उचलले

एटीएसने जालन्यातून संशयिताला उचलले

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 1:43AMजालना : पुढारी वृत्तसेवा

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी सकाळी शहरातून झेरॉक्स व डीटीपी सेंटर चालवणार्‍या गणेश कपाळे याला ताब्यात घेतले. यापूर्वीच नालासोपारा स्फोटके आणि दाभोलकर हत्या प्रकरणासंदर्भात अटकेत असलेल्या श्रीकांत पांगारकरचा तो मित्र आहे.  डीटीपी सेंटरच्या संगणकात वरील प्रकरणांसंदर्भात ई-मेल्स अथवा काही मजकूर असल्याच्या संशयावरून कपाळेला ताब्यात घेण्यात आले. औरंगाबादच्या चार ते पाच जणांच्या एटीएस पथकाने त्याच्या दुकानाची झडती घेतली. संगणकाचा सीपीयू, मॉनिटर, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले.