Wed, Jan 23, 2019 12:46होमपेज › Jalna › दहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी 

दहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी 

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:02AMजालना : प्रतिनिधी

शहरातील मंठा चौफुली परिसरात ील पत्राच्या शेडमध्ये असलेल्या दुकानांना शुक्रवारी (दि.25) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंठा चौफुली परिसरात पत्रेच्या शेडमध्ये असलेली गॅरेज, हॉटेल्स, हेअर सलून, जनरल स्टोअर्स, कोल्ड्रिंक सेंटर, पानटपरीसह अन्य दुकानाला आग लागली. हॉटेलमधील भट्टीमुळे आग लागल्याचे समजते. आग लागताच व्यवसायिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानानी ही आग एक ते दीड तासात विझविली. दुकानातील फर्निचर, खुर्च्या, टेंबल, फ्रीज, सलून साहित्य, हॉटेलचे साहित्य तसेच गॅरेजमधील साहित्यही जळून खाक झाले. आग लागल्याने या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काहीकाळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आग आटोक्यात आल्याने इतर दुकानांना या आगीची छळ बसली नाही.