Tue, Jul 16, 2019 02:15होमपेज › Jalna › तीन वर्षांपासून तंटामुक्‍त गाव मोहीम थंडावली

तीन वर्षांपासून तंटामुक्‍त गाव मोहीम थंडावली

Published On: Apr 24 2018 1:39AM | Last Updated: Apr 24 2018 1:33AMजालना ः प्रतिनिधी

गावातील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्‍तगाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्‍त समित्या स्थापन करण्यात आल्या. 
या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला, परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली असून गावातील तंटामुक्‍त समित्या केवळ कागदावरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या- मोठ्या कारणावरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ गमवण्याची वेळ येते. दारूमुळे हे सर्व घडत असते. म्हणून दारूचे समूळ गठित समित्या कागदावरच उच्चाटन व्हावे, गावागावांत शांतता नांदावी यासाठी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 2006 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. ग्रामीण भागात सुरू केलेली मोहीम यशस्वीरीत्या सुरू  झाल्यानंतर काही वर्षे प्रभावीपणे राबविण्यात आली.

तंटामुक्त झालेल्या गावांना राज्य शासनाकडून घसघशीत पारितोषिकही देण्यात आले. त्यामुळे गावात चालणारे दारू, जुगार आदी अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत झाली. शिवाय गावातील प्रलंबित अनेक खटले निकाली काढून गावातही आनंदी वातावरण निर्माण करण्यास मदत झाली. व्यसनाधिनतेमुळे निर्माण होणार्‍या तंट्याचे निवारण करण्यासाठी गावात सुरू झालेली चळवळ गाव विकासाला पोषक ठरू पाहात होती, परंतु गेल्या दोन -तीन वर्षांपासून तंटामुक्त गाव चळवळ थंडावली असल्याचे चित्र आहे. तंटामुक्त गाव समित्या केवळ नावालाच उरल्या असल्याने गावातील तंट्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी समापोचाराने गावातील तंटे गावातच मिटवली जात होती.

Tags : tantamukta gaon, quarrel free village campaign, jalana