होमपेज › Jalna › ‘स्वाभिमानी’चे जलसमाधी आंदोलन

‘स्वाभिमानी’चे जलसमाधी आंदोलन

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:34PMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावेत, नवीन तंत्रज्ञानाची दारे खुली करून कपाशीचे बीजी 3 व बीजी 4 ची बियाणे उपलब्ध करावीत यांसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मात्र कृषी विभागाने पंचनामे केले नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. वडीगोद्री शिवारातील जायकवाडी प्रकल्पाच्या डावा कालव्यात जनावरांसह हे आंदोलन करण्यात आले. बोंडअळीग्रस्त कपाशीचे उपटलेली झाडे डाव्या कालव्यात टाकून एक तासभर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. 

यावेळी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, तालुका अध्यक्ष राजेंद्र खटके, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सरचिटणीस ताराचंद पवार, नारायण डहाळे, भारत उंडे, लक्ष्मण वाघमारे, अशोक काळे, वसंत दळवी, विद्यार्थी आघाडीचे गणेश गावडे आदी पदाधिकार्‍यांची  उपस्थिती होती.